लंपी स्किन आजार नियंत्रणात आणा – शिवसेनेची मागणी

यावल -लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यात मोठया प्रमाणावर लंपी स्किन डिसेज आजारामुळे अनेक गुरांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. गुरांचे लसीकरण करून आजारावर नियंत्रण मिळवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी शिवसेनेनेतर्फे तहसीलदारांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की,  तालुक्यातील गुराढोरांवर आलेल्या संसर्गजन्य लंपी स्किन डिसेज या गंभीर संसर्गजन्य आजाराने शेतकऱ्यांची अनेक गुरढोर मरण पावली आहेत. या संदर्भात प्रशासनाने तात्काळ उपाय योजना आखून गुराढोरांचे मोफत लसीकरण करावे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने महेश पवार यांनी तहसीलदार यांच्याकडे  निवेदनाद्वारे करण्यात आलेली आहे.   निवेदनात म्हटले आहे की सध्या यावल शहर व तालुक्यात गुरांवर आलेल्या लंपी स्किन डिसेज  या संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे.  या संसर्गजन्य आजारामुळे शेतकरी संकटात सापडला असून अनेक शेतकऱ्यांचे गुरढोर मृत्युमुखी पडली आहेत.  हा  संसर्गजन्य रोग पसरू नये याकरिता प्रशासनाने तात्काळ उपाययोजना आखावी तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शिवसेना यावल तालुकाप्रमुख रविंद्र सोनवणे व यावल शहर शिवसेना शहर प्रमुख जगदीश कवडीवाले,  शहर उपप्रमुख संतोष खर्चे, सारंग बेहडे, योगेश चौधरी, मयुर खर्च, हेमंत पाटील , सुरेश कुंभार , सागर देवांग , पिंटू कुंभार, विवेक अडकमोल आदी कार्यकर्त्यांनी केली आहे.

Protected Content