वाहनाचा कट लागल्यावरून रिक्षा चालकावर चॉपरहल्ला !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील सुभाष चौकात दुचाकीचा कट लागल्याने गाडी हळू चालव बोलल्याचा राग आल्याने ट्रिपलसीट असलेल्या दुचाकीस्वारांनी रिक्षा चालकावर चॉपरने हल्ला केल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. याप्रकरणी शनिपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

जळगाव शहरातील फातेमा नगरात आवेश शरीफ खाटीक हा तरुण रिक्षा चालक असून तो सुभाष चौकातील रिक्षा स्टॉपजवळ उभा होता. दरम्यान, गुरूवार ७ मार्च रोजी दुपारी ४.३० वाजेच्या सुमारास त्याठिकाणाहून ट्रीपलसीट दुचाकीस्वार जात होते. त्यांचा आवेशला कट लागल्याने आवेश याने गाडी हळू चालव असे म्हणाला. त्याचा राग आल्याने ट्रीपलसीट असलेल्या दुचाकीस्वारांनी आवेशवर चॉपरने हल्ला केला. यामध्ये आवेश गंभीर जखमी झाला. भरदिवसा आवेशवर चॉपरने हल्ला झाल्यामुळे सुभाष चौक परिसरात खळबळ उडाली होती. घटनेची माहिती मिळताच शनिपेठ पोलिसांनी त्याठिकाणी धाव घेतली. मात्र हल्लेखोर मात्र तेथून पसार झाले होते. याप्रकरणी आवेश खाटीक याने दिलेल्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

Protected Content