तरूणाची मोटारसायकल लांबविली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आकोला बॅकेजवळून तरूणाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गणेश संजय बारी (वय-२९ रा. मारोती पेठ, जळगाव) हा तरूण वास्तव्याला आहे. खासगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. मंगळवार ५ मार्च रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास त्याची दुचाकी क्रमांक (एमएच १९ सीए ४२९३) ने जळगाव शहरातील आकोला बँकेजवळ आलेला होता. त्यावेळी दुचाकी बँकेच्या समोर पार्कींग करून लावली होती. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ही दुचाकी चोरून नेली. दुचाकी चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू कोणतीही माहित मिळाली नाही. अखेर गुरूवार ७ मार्च रोजी दुपारी ३ वाजता जळगाव शहर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास योगेश पाटील हे करीत आहे.

Protected Content