घरात घसून महिलेला मारहाण करत विनयभंग

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील आशाबाबा नगरात राहणाऱ्या महिलेचा हात धरून शिवीगाळ व मारहाण करत विनयभंग केल्याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करयात आला आहे.

पोलीस सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, जळगाव शहरातील आशाबाबा नगर परिसरातील एका भागात ३७ वर्षीय महिला ही आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. बुधवार ६ मार्च रोजी रात्री ८ वाजता महिला ही घरी असताना संदीप श्रावण बागडे रा. कंजरवाडा, जळगाव हा महिलेच्या घरी आला. यावेळी काहीही कारण नसतांना महिलेचा हात पकडून शिवीगाळ व मारहाण केली. आणि लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर गुरूवार ७ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता महिलेने रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी संदीप बागडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ शरद वंजारी हे करीत आहे.

Protected Content