चोपडा तालुक्यात जलसंधारण कृती समितीचे उल्लेखनीय कार्य

chopda news

चोपडा (प्रतिनिधी)। तालुक्यातील वराड रस्त्यावरल नाला खोलीकरणाचे काम करण्यास सुरूवात करण्यात आले आहे. तालुक्यात पाणी आडवा पाणी जिरवा ही संकल्पना लक्षात घेवून पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नाला खोलीकरण्याच्या कामांना सुरूवात करण्यात आले.

वराड रस्त्यावरील नाला खोलीकरण करून हजारो लीटर पाणी अडविण्याचा संकल्प करून तो सिद्धीस नेण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. आतापर्यंत दोन मोठया बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्यात आले असून आता तिसऱ्या बंधाऱ्याला सुरवात झाली आहे. सदर कामात डॉक्टर मंडळींचे मोठे सहकार्य लाभत आहे. तरी सामाजिक बांधिलकी व राष्ट्रहिताचे कार्य समजून आपणही सहकार्य करण्याचे आवाहन जलसंधारण समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

Add Comment

Protected Content