एरंडोल येथे रिक्षा चालकाची मुलगी बारावीच्या परीक्षेत प्रथम (व्हिडीओ)

f1c08009 20f3 4416 9f88 4d0ec4f2b14a

एरंडोल (प्रतिनिधी) तालुक्यातील जवखेडेसिम येथील रहिवाशी व रिक्षा चालक अनिल भावलाल चौधरी यांची मुलगी मयुरी अनिल चौधरी ही नुकत्याच झालेल्या बारावीच्या परीक्षेत येथील दादासाहेब दिगंबर शंकर पाटील कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालयातून प्रथम आली आहे. मयुरीने मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

 

तालुक्यातील जवखेडेसिम येथील अनिल चौधरी हे गेल्या १२ वर्षांपासुन रिक्षा चालकाचा व्यवसाय करीत असुन मयुरीची आई गावातील शेतात मजुरी करून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह करीत आहे. अशा अत्यंत प्रतिकुल परीस्थितीत मयुरीने जिद्दीने अभ्यासावर लक्ष केंद्रित करून बारावीच्या परीक्षेत ८०.२९ टक्के गुण मिळवुन पाटील महाविद्यालयातील तिन्ही शाखेतुन प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळवला आहे. यामुळे संस्थेचे अध्यक्ष अमित पाटील, प्राचार्य डॉ.ए.आर. पाटील, उपप्राचार्य एस.एच. पाटील, पर्यवेक्षक नरेंद्र गायकवाड व संचालक मंडळ यांनी तिचे अभिनंदन केले आहे. मयुरीने भविष्यात सी.ए. होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

 

Add Comment

Protected Content