एरंडोल तालुक्यात शिवराज्यभिषेक दिन उत्साहात

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील पंचायत समिती व एकुण ५२ ग्रामपंचायतीत ३४८ वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्यात आला.

एरंडोल पंचायत समितीच्या आवारात प्रथम भगवा ध्वजाचे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विधिवत पूजन करण्यात आले.त्यानंतर सामूहिक महाराष्ट्र गीत व राष्ट्रगीत म्हणुन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.याप्रसंगी माजी उपसभापती अनिल महाजन, माजी सभापती दिलीप रोकडे,गटविकास अधिकारी बी.एस.आकलाडे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ फिरोज शेख,गटशिक्षणाधिकारी विश्वास पाटील,कार्यालयीन अधीक्षक चव्हाण,सरपंच निपाने कमलेश महाजन,केशव ठाकुर, पंचायत समिती सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन व आभार तुषार वडगावकर यांनी मानले.

 

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.