कासोदा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती साजरी

kasoda

कासोदा प्रतिनिधी । येथील प्रगती बहुद्देशीय संस्था व साप्ताहिक विचार वैभव कार्यालयात आणि शहरातील इतर ठिकाणी आज (दि.१२) रोजी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सी.जी.पाटील हे होते. दरम्यान त्यांनी या दोघांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित कासोदा पोलीस ठाण्याचे स.पो.नि.रवींद्र जाधव, सरपंच उमेश पाटील, सरपंच संजय चौधरी, प्रगती बहूद्देशिय संस्थेचे अध्यक्ष प्रवीण बाविस्कर, शिवसेना उपतालुका प्रमुख रवी चौधरी, राजेंद्र ठाकरे, भास्कर चौधरी, मराठी पत्रकार संघाचे ता.अध्यक्ष सागर शेलार, पत्रकार प्रशांत सोनार, पत्रकार राहुल मराठे, भारत चौधरी, पत्रकार भाऊसाहेब पाटील, दीपक शिंपी, जितेंद्र ठाकरे, मयुर बेडिस्कर, हेमंत मोरे, कॉ.दिपक आहिरे, होमगार्ड आनंद विसपुते, होमगार्ड बाळू जाधव यांच्यासह आदि पत्रकार व प्रगती संस्थेचे सद्स्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कर्यक्रमा प्रसंगी कासोदा येथील मागील आठवड्यात आपल्या कर्तव्यावर खरे उतरत दरोडा होण्यापूर्वीच गावाला जागे करत चोरांच्या पाठीमागे धावलेले होमगार्ड बाळू जाधव, आनंद विसपुते व स.पो.नि. रवींद्र जाधव यांचा देखील सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भास्कर चौधरी यांनी केले तर आभार राहुल मराठे यांनी माणले.

तसेच कासोदा पोलिस स्टेशन येथे ही स.पो.नि.रविंद्र जाधव यांच्याहस्ते प्रतिमा पूजन करून राष्ट्रमाता जिजाऊ व योग पुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरा करण्यात आली. त्याप्रसंगी सर्व पोलिस कर्मचारी व विचार वैभव टीम उपस्थितीत होती.

कासोदा येथील भारती विद्या मंदिर शाळेत राष्ट्रमाता जिजाऊ व योग पुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. त्याप्रसंगी शाळेचे उपशिक्षक राजेंद्र ठाकरे व विद्यार्थी-विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Protected Content