जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील म्हसावद येथे आषाढी एकादशी निमित्त इंग्लिश स्कूल आणि मध्यमिक विद्यालय लमांजनच्या वतीने सकाळी हरीनामाच्या गजरात विद्यार्थ्यांनी दिडी काढण्यात आली.
आषाढी एकादशी निमित्त म्हसावद येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील इंग्लिश मीडीअम स्कूच्या विद्यार्थ्यांनी आषाढी निमित्त पालखी सोहळ्याचे आयोजन करून दिंडी काढण्यात आली. यावेळी लहानग्या चिमुकल्यांनी पारंपारिक पध्दतीने वारकऱ्यांच्या वेशभूषा साकारली होती. हरीनामाचा जयघोष करत गावातून दिंडी काढण्यात आली. गावातील रस्त्यांवर ठिकठिकाणी रांगोळ्या काढण्यात येवून दिंडीचे स्वागत करण्यात आले.
यावेळी गावातील सरपंच गोविंदा पवार, उपसरपंच अनिल कोळी, ग्रामपंचायत सदस्य आबा चिंचोरे, पिंटू पाटील, मुख्याध्यापिका श्रीमती चव्हाण, शिक्षक बच्छाव, बापू धनगर, अहमद शहा, प्रविण धनगर, पप्पू धनगर, पत्रकार दीपक महाजन यांची उपस्थिती होती.