मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी तरूणांचे विविध मागण्यांचे निवेदन

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या प्रशिक्षणार्थी यांनी आपल्या प्रलंबित आणि विविध मागण्यांसाठी गुरूवारी दुपारी वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षणार्थी सर्व स्थापना मध्ये सहा महिन्यांचे कार्यकाळ प्रशिक्षण घेत आहेत, तसेच त्यांचा कार्यकाळ आता पूर्ण होत असून त्यासाठी हा कार्यकाळ पुन्हा वाढवून देण्यात यावा, तसेच शासकीय आणि निमशासकीय नोकरांना प्रासंगिक रजा आणि वैद्यकीय रजांप्रमाणे प्रशिक्षणार्थी तरुणांना रजा देण्यात यावी. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांना किमान वेतन कायद्यानुसार २० हजार रुपये मासिक वेतन देण्यात यावे. यासह इतर प्रलंबित मागण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत काम करणाऱ्या सर्व तरुणांनी गुरुवारी २६ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात येऊन जिल्हा प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.

Protected Content