अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चुलीतून आलेल्या धुर का उडविला असे विचारल्याच्या कारणावरून एका महिलेला शिवीगाळ व मारहाण करत लोखंडी पान्याने मारून दुखापत करत विनयभंग केल्याची घटना बुधवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता घडली आहे. याप्रकरणी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमळनेर शहरातील पैलाड गावात ५४ वर्षीय महिला ही आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. बुधवारी २५ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातून चुलीचा धुर आला. त्यावेळी धुर का उडविला असे महिला बोलल्या. या रागातून संशयित आरोपी कैलास गुलाब भोई, रविंद्र गुलाब भोई आणि गुलाब मांगो भोई सर्व राहणार पैलाड भाग, अमळनेर यांनी महिलेला शिवीगाळ करत मारहाण केली. तर एकाने लोखंडी पाना मारल्याने जखमी करत त्यांचा विनयभंग केला. ही घटना घडल्यानंतर महिलेने बुधवारी २५ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित आरोपी आरोपी कैलास गुलाब भोई, रविंद्र गुलाब भोई आणि गुलाब मांगो भोई सर्व राहणार पैलाड भाग, अमळनेर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ गणेश पाटील हे करीत आहे.