चहार्डी जि.प. शाळेत सोलर पॅनल

charhadi zp school

चोपडा प्रतिनिधी । तालुक्यातील चहार्डी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत नुकतेच सोलर पॅनल बसविण्यात आले.

जिल्हा नियोजन समिती जळगाव २०१७-१८ च्या नाविन्यपूर्ण योजनेतून हाडीफ-बुधगाव गटातील चहार्डी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रा.डॉ निलम पाटील, जिल्हा परिषद सदस्य व जिल्हा नियोजन समिती सदस्य यांच्या प्रयत्नामुळे व तत्कालीन जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्या सहकार्याने सोलर पॅनल बसविण्यात आले.सहा पॅनल, दोन बॅटरी बॅकअप संच व इनव्हर्टर असा संच आहे. सोलर पॅनलचे उदघाटन जिल्हा परिषद सदस्य प्रा.डॉ निलम पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

चहार्डी येथील शाळेस १२ वर्ष पूर्ण झाले तरी अजून लाईट नव्हते. आता मात्र सोलर पॅनल बसविण्यात आले त्यामुळे विजेचा मोठा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटल्याचे समाधान शिक्षक व ग्रामस्थांच्या चेहर्‍यांवर झळकत होते. गटातील कुरवेल, खाचणे,अनवद,व वेले- आखतवाडे ह्या गावात पण सोलर पॅनल बसविण्यात येणार आहे.गटातील पाच गावांतील शाळांचा विजेचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटणार आहे.इतर शाळांसाठी पण प्रयत्न सुरू असल्याचे डॉ निलम पाटील यांनी अध्यक्ष स्थानावरून बोलताना सांगितले.

या प्रसंगी पं.स. सदस्या मालुताई कोळी, केंद्र प्रमुख नरेंद्र भाऊसाहेब सोनवणे, ग्रा.प.सदस्य जगदीश पाटील,प्रकाश सोनवणे, रघुनाथ वारडे, शालेय समिती सदस्य सुनिल भाऊ, कल्याण सर, संभाजी राजे, शाळेचे मुख्याध्यापक बडगुजर, योगेश पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका व आशा सेविका उपस्थित होत्या.

Protected Content