धरणगावात संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

sena maharaj jayanti dharangaon

धरणगाव प्रतिनिधी । येथील नगर पालिकेत समस्त नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री.संतश्रेष्ठ सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

धरणगाव येथील नगर परिषदेत़र्फे नाभिक समाजाचे आराध्य दैवत श्री.संतश्रेष्ठ सेना महाराज यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी प्रभारी नगराध्यक्षा अंजली विसावे यांनी संत सेना महाराज यांच्या प्रतिमेसे पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. या कार्यक्रमास समस्त नाभिक समाजाचे तालुका प्रमुख सतीश बोरसे व धरणगाव शहरातील समस्त नाभिक समाजाचे अध्यक्ष व पंच मंडळ, शिवसेनेचे गट नेते विनय भावे,चर्मकार समाजाचे राष्ट्रीय कार्यध्यक्ष भानुदास विसावे, नगरसेवक विजय महाजन, जितेंद्र धनगर,भाजपचे गट नेते कैलास माळी,ललित येवले, किरण अग्निहोत्री,रवींद्र जाधव, युवासेनेचे उपतालुका प्रमुख कमलेश बोरसे, नगर पालिकाचे कर्मचारी संजय मिसर,दिपक चौधरी, युवराज मराठे, बाबु खा तडवी, कर निरीक्षक प्रणव पाटील आदींची उपस्थिती होती.

Protected Content