चोपडा प्रतिनिधी । येथे राष्ट्रवादी काँग्रेसने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात मोठी गर्दी जमवून नियमांचे उल्लंघन करण्यात आल्याने कारवाई करावी अशी मागणी भाजपचे पदाधिकारी घनश्याम अग्रवाल यांनी केली आहे.
येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे २४ रोजी चोपडा उपजिल्हा रुग्णालयात झुणका भाकर केंद्र सुरु करण्याच्या नावावर मोठी गर्दी जमवली होती. या वेळी कोरोना नियमांचे पालन न करणार्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजपचे माजी केंद्रीय सदस्य घनश्याम अग्रवाल यांनी केली आहे.
या संदर्भात घनश्याम अग्रवाल म्हणाले की, गेल्या महिन्यात मंत्री जयंत पाटील यांच्या कार्यक्रमातही राष्ट्रवादीने खूप मोठी गर्दी जमविली होती. यानंतर पुन्हा झुणका भाकर केंद्र सुरू करण्याचा कार्यक्रमात मोठी गर्दी केल्याचे दिसून आले असून यामुळे कोरोना वाढवायचा आहे काय? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
परिणामी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गर्दी करणार्या लोकांवर पोलिसांनी नियामुसार कारवाई करावी अशी मागणी भाजपचे माजी केंद्रीय समिती सदस्य घनश्याम अग्रवाल यांनी केली आहे. घनश्याम अग्रवाल यांनी सांगितले की, कोरोना अद्याप गेला नसून राष्ट्रवादी अशा कार्यक्रमातून गर्दी करून काय साध्य करत आह. सामान्य माणूस रस्त्यावर एकटा फिरत असला तरी त्यावर पोलिस कारवाई करतात. तर चोपडा राष्ट्रवादी पक्ष या काळात गर्दी बोलावत आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा सर्वात मोठा विस्फोट चोपडा तालुक्यात झाला. त्यात अनेकांनी प्राण गमावले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला याची चिंता वाटत नाही का? असा प्रश्न देखील अग्रवाल यांनी विचारला आहे.