धक्कादायक : आंतरजातीय विवाहाच्या रागातून बापाने केला गरोदर मुलीसह जावायावर प्राणघातक हल्ला

चोपडा प्रतिनिधी ।  तालुक्यातील वर्डी येथील रहिवासी असलेल्या मुलीने आंतरजातीय विवाह केल्याचा रागातून मुलीचे वडील व भावाने  गरोदर असलेल्या मुलीसह जावायावर विळ्याने प्राणघात हल्ला केल्याचे घटना घडली. हल्ल्यात दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

अधिक माहिती अशी की, तालुक्यातील वर्डी येथील संतोष देवराम पाटील यांची मुलगी जया ठाकरे हिने गावातील दिनेश ठाकरे यांच्याशी वर्षभरापुर्वी पळून जावून आंतरजातीय लग्न केले. गेल्या दोन वर्षांपासून दोघे बाहेरगावी राहत होते. गेल्या महिन्याभरापासून दोघे पुन्हा गावात राहण्यासाठी आले होते. 

एक वर्षपुर्वी मुलीने आंतरजातीय विवाह केला या रागा पोटी मुलीचे वडील संतोष पाटील व  भाऊ सुनील संतोष पाटील या दोघानी जावई दिनेश ठाकरे यांच्यावर गावाबाहेर एकट्याला गाठून विळ्याने डाव्या हातावर व पाठीवर प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. त्यानंतर दिनेशच्या घरी जाऊन दिनेशची पत्नी म्हणजेच पोटची मुलगी जया ठाकरे हिच्यावर वडील व भावाने विळा व हातोडीने डोक्याला व हाताला गंभीर जखमी केले. मुलीच्या हाताचे बोटे कापले गेले. जया ठाकरे ही गरोदर असून तीची प्रकृती चिंताजनक आहे. घटनेनंतर दोघांना तातडीने जळगाव जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले आहे.  

Protected Content