केळी पीक विम्याच्या निकषात बदल करा : खा. उन्मेष पाटील

जळगाव | केळी पीक विम्यातील नवीन निकषांमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असून यात बदल करण्याची मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

खासदार उन्मेष पाटील यांनी कृषीमंत्री दादा भुसे यांना एक निवेदन दिले आहे. यात केळी पिकाच्या नुकसानीबाबत फळपीक विम्यात काही बाबींचा समावेश करण्यात आलेला आहे. परंतू वादळामुळे केळीचे पाने फाटणे, केळीचे रोप, कंदमुळे ढिली होणे आणि यामुळे होणार्‍या नुकसानीचा त्या विम्याच्या निकषामध्ये समावेश करावा अशी मागणी खासदार उन्मेष पाटील यांनी केली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, निमखेडी केळी संशोधन केंद्राकडून मिळालेल्या माहितीनुसार केळीचे घड निसवण्याच्या व फळ वाढीच्या काळात केळीचे पाने जास्तीची फाटल्यास पाने लवकर सुकतात, ज्यामुळे गुणवत्तेत घट होऊन नुकसान होते. तसेच वादळी वार्‍याने केळी कंद/रोपे/झाडांची मुळ सैल झाल्यास झाडांना अन्नद्रव्ये पुरेसे मिळत नाही. यामुळे घडावर विपरित परिणाम होऊ शकतो. तसेच हवेमुळे झाड कोलमडून पडते. या नुकसानीचे निकष देखील समाविष्ट करावे असे निवेदनात म्हटले आहे.

Protected Content