रांची-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । चंपाई सोरेन झारखंडचे नवे मुख्यमंत्री होणार आहेत. हेमंत सोरेन यांनी आज राजभवन येथे येऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर आमदारांनी विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून चंपाई सोरेन यांची निवड केली. आजच शपथविधी सोहळा होणार असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे झारखंडमध्ये झालेली ही मोठी उलाथपालथ म्हणावी लागेल.
हेमंत सोरेन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ईडीने त्यांना १० वेळा समन्स पाठवला होता. त्यामुळे ते मुख्यमंत्रीपद सोडतील हे निश्चित होतं. चंपाई सोरेन यांना ४१ आमदारांचे समर्थन आहे. झारखंडमध्ये एकूण आमदारांची संख्या ८० आहे. सोरेन यांनी राजभवन येथे येऊन राजीनामा दिल्यानंतर त्यांना ईडीने ताब्यात घेतले होते. झारखंडच्या मु्ख्यमंत्रीपदी हेमंत सोरेन यांच्या पत्नी कल्पना सोरेन या विराजमान होतील अशी शक्यता व्यक्त करण्यात आली होती. पण, दुसरे एक नाव चर्चेत होते. ते म्हणजे चंपाई सोरेन यांचे. ते कोण आहेत हे आपण जाणून घेऊया.