‘त्या’ नराधमाची पोलीस कोठडीत रवानगी

चाळीसगाव प्रतिनिधी | नात्यातील बालिकेवर अत्याचार करणार्‍या सावळाराम भानुदास शिंदे या आरोपीला न्यायालयाने ४ डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

नात्यातीलच तरुणाने चिमुरडीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना चाळीसगाव शहरात दोन दिवसांपूर्वी घडली होती. शहरातील एका भागातील एका नातेवाईकाकडे संशयित सावळाराम भानुदास शिंदे (वय २७) हा आला होता. शनिवारी रात्री रेल्वे स्टेशनच्या बाजूला निर्जनस्थळी नेऊन संशयिताने चिमुरडीवर अत्याचार केला होता. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. याप्रकरणी संशयित सावळाराम भानुदास शिंदे याला न्यायालयाने ४ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

दरम्यान, पीडीत बालिकेवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या प्रकरणाचा पुढील तपास चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक के. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Protected Content