चाळीसगाव शहरातून अल्पवयीन मुलास पळविले; गुन्हा दाखल

चाळीसगाव, प्रतिनिधी | शहरातील आदीत्यनगरात राहणा-या १३ वर्षीय अल्पवयीन मुलास अज्ञाताने फुस लावून पळवून नेल्याची धक्कादायक घटना रात्री उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव शहरातील आदीत्यनगर येथील योगेश छोटू कोळी (वय-१३) हा अल्पवयीन मुलगा गल्लीत खेळत असताना अज्ञात इसमाने फुस लावून त्याला पळविल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी रात्री ७:३० ते ८:३० वाजताच्या सुमारास उघडकीला आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. त्यावर घरच्यांनी परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली असता योगेश हा मिळून आला नाही. म्हणून कोणीतरी अज्ञात इसमाने अपहरण केल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वडील छोटू तानाजी कोळी (वय-४१- रिक्षाचालक) यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिस स्थानकात भादवी कलम-३६३ प्रमाणे अज्ञात इसमाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक के. के. पाटील यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सपोनि दिपक बिरारी हे करीत आहेत.

Protected Content