चाळीसगावात भाजपचे नगरसेवक भिडले; हाणामारीमुळे गोंधळ

चाळीसगाव प्रतिनिधी । अतिक्रमणाच्या प्रश्‍नावरून आज भाजपच्या दोन्ही नगरसेवकांमध्ये हाणामारी झाल्यामुळे परिरसात काही काळ तणावाचे वातावरण पसरले.

याबाबत वृत्तांत असा की, चाळीसगाव शहरातील स्टेशन परिसरातील अतिक्रमण काढण्याच्या वादावरुन सोमवारी सकाळी भाजपाचे दोन्ही नगरसेवक एकमेकांविरूध्द भिडले. शहरातील स्टेशन पोलीस चौकी ते मंजिदपर्यंत अतिक्रम काढण्यास नगर परिषदेकडून सोमवरी संकाळी सुरुवात करण्यात आली. यावेळी प्रभाग क्रं.९ नगरसेवक चंद्रकांत तायडे व प्रभाग क्र.१० चे नगरसेवक चिराउद्दीन शेख हे दोन्ही त्याठिकाणी उपस्थित होत. तसेच भाजपाचे शहराध्यक्ष तथा नगरसेवक घृष्णेेश्‍वर पाटील देखील थोडयावेळात त्याठिकाणी आले. लोक अतिक्रमण काढत असताना एक टपरी न काढण्याची विनंती नगरसेवक चंद्रकांत तायडे यांनी केली. यावरुन नगरसेवक शेख चिरागुद्दीन रफीक शेख यांनी चंद्रकांत तायडे यांना समाजवण्याची प्रयत्न केला, परंतू वाद आधिक वाढल्यामुळे वादाचे रुपयांतर हाणामारीत झाले. दोन्ही नगरसेवकांनी एकमेकांना खाली पाडून चांगलीच हाणामारी केल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडला होता. जवळच उभे असलेेले भाजपाचे शहराध्यक्ष मात्र दोघांमध्ये मारामारी होईपर्यंत गप्प उभे असल्याची माहिती मिळाली.

तसेच मारामारी झाल्यानतंर त्यांनी हस्तक्षेप केल्याचे देखील उपस्थितांमधून सांगण्यात आले. घटना घडल्यानतंर पत्रकारांनी दोन्ही नगरसेवकांना विचारपूस केली असता, दोन्हीही काहीच झाले नसल्याच आव आनला, मात्र या घटनेची चर्चा संपूर्ण शहरभरात वार्‍यासारखी एक मिनिटात पोहचली होती. सध्या शहरात याचीच चर्चा सुरू आहे.

दरम्यान, भाजपचे शहराध्यक्ष घृष्णेश्‍वर पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना आपण दोन्ही सहकार्‍यांना आवरण्याचा प्रयत्न केला. त्यांनी भांडण करू नये असे प्रयत्न केल्याची माहिती दिली.

Add Comment

Protected Content