जळगावातील विद्यार्थ्याना ‘स्पिंग स्कूल’ उपक्रमांतर्गत जापान विद्यापीठाचे प्रमाणपत्र

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । ‘स्पिंग स्कूल’ उपक्रमांतर्गत १० दिवसांचा अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावचे कुलगुरुं प्रा. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना तोकुशिमा विद्यापीठाच्या अध्यक्षांच्या सहीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

तोकुशिमा विद्यापीठ, तोकुशिमा, जापान व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांच्या अंतर्गत झालेल्या सामंजस्य कराराअंतर्गत विद्यापीठाच्या पाच विद्यार्थ्यांनी ‘स्पिंग स्कूल’ उपक्रमांतर्गत १० दिवसांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. विद्यापीठाचे कुलगुरुं प्रा. विजय माहेश्वरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना तोकुशिमा विद्यापीठाच्या अध्यक्षांच्या सहीचे अभ्यासक्रम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र देण्यात आले.

यावेळी प्रभारी प्र-कुलगुरु प्रा.एस.टी.इंगळे, व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, आंतरराष्ट्रीय विद्यार्थी कक्षाचे सल्लागार प्रा.ए.एम.महाजन,  प्रभारी कुलसचिव के.एफ.पवार उपस्थित होते. तोकुशिमा विद्यापीठ, तोकुशिमा, जापान व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ या दोन्ही विद्यापीठाअंतर्गत झालेल्या सामंजस्य कराराच्या अनुषंगाने सुमारे ७-८ वर्षापासून विद्यार्थी व शिक्षक यांची शैक्षणिक उपक्रमांसाठी आदान प्रदान होत असते.

 

कोरोना महामारीपूर्वी २०१९ पर्यंत दरवर्षी अशा प्रकारच्या आंतरराष्ट्रीय स्कूल्स आयोजित करुन तोकुशिमा विद्यापीठ, जापान येथे जाऊन विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना तेथील शैक्षणिक उपक्रमांत सहभागी होता येत होते.

परंतु गेल्या दोन शैक्षणिक वर्षापासून ऑनलाईन पध्दतीने आंतरराष्ट्रीय उपक्रमात विद्यापीठाचे विद्यार्थी सहभागी होत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून नुकतेच १० दिवसांच्या आंतरराष्ट्रीय उन्हाळी स्कूलसाठी विद्यापीठाचे वैष्णवी पाटील, कल्याणी पाटील, तेजस्वीनी बोरसे, विपूल शिंपी व वैभव बोरोकार या पाच विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून हा ऑनलाईन अभ्यासक्रम यशस्वीरित्या ऑनलाईन पूर्ण केला.

या विद्यार्थ्यांना तोकुशिमा विद्यापीठाच्या अध्यक्षांच्या सहीचे यशस्वीतेचे प्रमाणपत्र पाठविण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र कुलगुरुंच्या हस्ते आज वितरित करण्यात आले. जापानच्या विद्यापीठातर्फे प्रोत्साहन म्हणून टी-शर्ट पाठविण्यात आले आहेत. तोकुशिमा विद्यापीठातर्फे डॉ.पंकज कोईनकर व प्रा.मिकितो येसुजावा यांनी या स्प्रिंग स्कूलचे आयोजन केले होते.

Protected Content