पालकमंत्र्यांच्या आमदार निधीतून दिव्यांगांच्या साहित्यासाठी १० लाख मंजूर

 

 

जळगाव  : प्रतिनिधी । पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी धरणगाव व जळगाव ग्रामीण तालुक्यातील दिव्यांग व्यक्तींच्या साहित्यकरीता दुसर्‍यांदा १० लक्ष रुपये मंजुर केले आहेत .

 

जिल्हा नियोजन समितीकडून या निधीला  प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली आहे. याचा धरणगाव व जळगाव तालुक्यातील  ५४५ दिव्यांगांना होणार लाभ होणार आहे.

 

आमदार स्थानिक विकास निधीतून प्रत्येक आमदारास दिव्यांग व्यक्तींच्या सहाय्यक साहित्य खरेदी करण्यासाठी   १० लक्ष रुपये उपलब्ध करुन देण्याची तरतूद असते. तरतुदीचे महत्व लक्षात घेऊन व दिव्यांग व्यक्तींप्रती संवेदना जागृत ठेवून पालकमंत्री यांनी दुसर्‍यांदा दिव्यांगांसाठी सहाय्यक साहित्य उपलब्धतेसाठी निधी उपलब्ध करुन दिला आहे.

 

राज्यात प्रथमच आमदार निधीतून वर्ष २०१८ अंतर्गत ना. गुलाबराव पाटील यांनी दिव्यांगांच्या शारिरीक पुनर्वसनाच्या हेतूने २५० दिव्यांग व्यक्तींना दहा लक्ष रुपयाचे दर्जेदार साहित्याचे वाटप केले  होते. यानंतर ना. पाटील यांनी दुसर्‍यांदा सुध्दा १० लाख निधीची तरतूद केली आहे. यातून ३४५ दिव्यांग व्यक्तींना तिनचाकी सायकल व्हिल चेयर, सी. पी. चेयर, कुबड्या, वॉकर, कर्णयत्रे अशा १० प्रकाराच्या साहित्याचे लवकरच वाटप करण्यात येणार आहे.

 

कोवीड-१९ महामारीच्या प्रादुर्भावाने अनेक दिव्यांग व्यक्ती हे सहाय्यक साहित्यापासून वंचीत होते. ३ वर्षापासून जिल्ह्यात दिव्यांगांना साहित्य वाटप झाले नसल्याने दिव्यांग व्यक्तींना सध्याच्या परिस्थितीत अडचणींचा सामना करावा लागत होता. दिव्यांग व्यक्तींची ही समस्या लक्षात घेऊन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी  १०  लक्ष रुपये मंजुर केले. सर्व प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वांगिण शारिरीक पुनर्वसन होऊन त्यांना तांत्रीक व पुनर्वसनात्मकदृष्ट्या दर्जेदार  साहित्य उपलब्ध होण्याकरीता जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या तज्ञामार्फत मुल्यमापन व तपासणी करण्यात येणार असून जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून साहित्य खरेदी करण्यात येणार आहे.

 

ना. गुलाबराव पाटील यांनी मंजूर केलेल्या निधीतून तीन चाकी सायकल – ६५ , व्हील चिअर – २४ , वाकिंग स्टिक -१३, अंध काठी- ३८ , एलबो स्टिक – ११, सी पी चेअर – ०४, कुबड्या – ५४, वॉकर – १६,  कर्णयंत्र – ४० असे विविध प्रकारचे दिव्यांग साहित्य ३४५ दिव्यांग व्यक्तींना लवकरच वाटप करण्यात येणार आहे.

 

Protected Content