गोलाणी मार्केटमधील नागोरी चहाच्या दुकानाला शार्टसर्कीटमुळे आग; किरकोळ नुकसान (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी ।  गोलाणी मार्केट परिसरातील इंडोअमेकरीकन हॉस्पिटलसमोर असलेल्या नागोरी चाहाच्या दुकानाला आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास अचानक आग लागल्याने फ्रिजचे मोठे नुकसान झाले आहे. अग्निशमन पथकाने ही आग काही मिनीटात विझविण्यात यश आले आहे. 

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील गोलाणी मार्केट मधील असलेल्या नागोरी चहाच्या नवीन दुकानाला आज सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास शार्टसर्किटमुळे अचानक आग लागली. या आगीत दुकानातील मोठे फ्रिज व खुर्ची जळून खाक झाल्याची घटना उघडकीला आली. यासंदर्भात दुकान मालक जामीर भाई नागोरी रा. जळगाव यांनी तातडीने महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या पथकाला फोन करून घटनेची माहिती दिली. अग्निशमन पथक बाजूला असल्यामुळे काही मिनीटाच्या आत घटनास्थळी दाखल झाले. तातडीने ही आगविझविण्यात आली. यात कोल्ड्रीक्स ठेवण्याचे मोठे मशीन व खुर्च्या जळून खाक झाले आहे. यासंदर्भात शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करण्यात येत आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा पोलीसांकडून नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू होते.

 

Protected Content