यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील डोंगर कठोरा येथील विविध कार्यकारी सहकारी विकास संस्थांना केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळातर्फे देण्यात येणारा सन 2020/2021 या वर्षातील सर्वोत्कृष्ट सहकारी संस्थेचा राज्यातून प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे.
वैंकुठ मेहता सहकारी प्रबंध संस्थान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ रोड, ज्युबली सभागृहात दिनांक १६ मार्च रोजी सहकार आयुक्त ( जीवोएम ) अनिल कवाडे , जी एस रावत (सिजीएम नाबार्ड महाराष्ट्र ), डॉ अभय देशपांडे (विभागीय मत्स्य आयुक्त पुणे ) आदी मान्यवरांच्या उपस्थितीत प्रधानमंत्री मत्स्ययोजना ( पि एम एम सि वाय ) च्या वतीने पुणे येथे आयोजीत एकदिवसीय जागुरूकता सहप्रशिक्षण शिबीरात संपन्न झालेल्या कार्यक्रमात यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या डोंगर कठोरा येथील विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीने केलेल्या उत्कृष्ठ कार्याबद्दल केन्द्र शासनाच्या वतीने दिला जाणारा क्षेत्रीय सहकारी उत्कृष्ठता श्रेष्ठता हा२०२o / २०२१साठीचा महाराष्ट्र राज्यातुन पहील्या क्रमांकाच्या पुरस्काराने कर्नल विनित नारायण ( जनरल मॅनेजर राष्ट्रीय सहकारी विकास निगम पुणे ) यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.
याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्विकारतांना विकास सोसायटीचे चेअरमन शोभा भिरूड, व्हाईस चेअरमन चेअरमन कल्पना राणे , माजी चेअरमन व विद्यमान संचालक अमोल भिरूड व सोसायटीचे सचिव विजयसिंग पाटील हे उपस्थित होते .डोंगर कठोरा गावाच्या विकास सोसायटीला मिळालेल्या राज्यातील उत्कृष्ठ सहकारी सोसायटी कार्याच्या पुरस्कारा मिळाल्या बद्दल अमोल भिरूड यांच्यासह संपुर्ण संचालक मंडळाचे सर्व स्तरावरून स्वागत व कौत्तुक करण्यात येत आहे .