राऊतांना ब्लॅकमेल करण्यासाठी कारवाई : पटोलेंचा आरोप

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | संजय राऊत यांना ब्लॅकमेल करण्यासाठी त्यांची ईडीतर्फे कारवाई करण्यात येत असल्याचा आरोप कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. पत्रा चाळ प्रकरणात सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते तथा खासदार संजय राऊत यांच्या घरी धडक देऊन त्यांची चौकशी सुरू केली आहे. आधी त्यांच्या भांडुप येथील निवासस्थानी छापा मारून चौकशी करण्यास प्रारंभ झाला. यानंतर त्यांच्या दादर येथील दुसर्‍या घरीदेखील छापा मारण्यात आला. काल रात्री उशीरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट झाल्यानंतर आज सकाळी लागलीच ईडीचा छापा पडल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे. यावरून आता कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. या संदर्भात नाना पटोले म्हणाले की, हा सर्व ब्लॅकमेलींगचा प्रकार आहे. राज्यपालांच्या वक्तव्यावरून उडालेली खळबळ शांत करण्यासाठी हा प्रकार करण्यात येत आहे. भाजप अजून किती जणांना जेलमध्ये टाकणार ? असा सवाल देखील पटोले यांनी उपस्थित केला. तर जनताच आता याचे उत्तर देणार असल्याचा इशारा देखील दिला.

 

 

 

Protected Content