संजय मांजरेकरांनी केला हर्षा भोगलेचा अपमान

Sanjay Manjrekar and Harsha Bhogle

मुंबई वृत्तसंस्था । भारत विरुद्ध बांगलादेश डे-नाइट कसोटी मालिकेत भारतीय संघाने विजय मिळवला. भारताने दुसऱ्या कसोटीत एक डाव व 46 धावांनी विजय मिळवत आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेतील अव्वल स्थानावरील पकड अजून मजबूत केली आहे. पण, या सामन्यात असा एक प्रसंग घडला की, ज्यामुळे नेटिझन्स चांगलेच संतापले असून या सामन्याचे समालोचन करणाऱ्या हर्षा भोगलेचा माजी कसोटीपटू आणि आता समालोचक असलेला संजय मांजरेकर यांनी ऑन एअर अपमान केला.

भारताच्या खात्यात 360 गुण जमा झाले आहेत. या सामन्यात 9 विकेट्स घेणाऱ्या इशांत शर्माला मॅन ऑफ दी मॅच पुरस्काराने गौरविण्यात आले. मात्र सामन्या दरम्यान मांजरेकर आणि हर्षा भोगले यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले. ‘गुलाबी चेंडूवरील कसोटीचे योग्य परिक्षण व्हायला हवे. खेळाडूंना त्या चेंडूवर नीटपणे खेळता येत आहे की नाही हे त्यांना विचारायला हवे’, असे मत हर्षा भोगलेने व्यक्त केले होते. मात्र त्यावर हर्षा भोगलेचे वाक्य अर्ध्यातच तोडत त्यावर संजय मांजरेकरने त्वरित उत्तर दिले. ते म्हणाला की, याबाबतच्या गोष्टी केवळ तुला विचारायला हव्या. कारण आमच्याकडे क्रिकेट खेळण्याचा पुरेसा अनुभव आहे.

Protected Content