टाकरखेडा जि.प मराठी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी

पहूर, ता.जामनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील टाकरखेडा येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नाना सुरळकर हे होते. उपस्थितांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी इयत्ता पहिली ते दुसरी साठी ‘अ’ गट, इयत्ता तिसरी ते चौथीसाठी ‘ब’ गट आणि इयत्ता पाचवी ते सातवीसाठी ‘क’ गट अशा तीन गटात वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेत एकूण ४९ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. कार्यक्रम प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील, देवाजी पाटील, जयंत शेळके, जयश्री पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती सांगितली.

वक्तृत्व स्पर्धेतील ‘अ’ गटात अनुक्रमे हर्षल राजेंद्र डोंगरे (प्रथम), रोहिणी सुधाकर गोसावी (द्वितीय) तर ‘ब’ गटात देवेंद्र रविंद्र सुरळकर (प्रथम), कुणाल बाळु न्हावी (द्वितीय) आणि ‘क’ गटात विभागून गितेश नारायण आगळे (प्रथम), मयुरी नाना सुरळकर (प्रथम), निकिता विलास साळुंखे (प्रथम) तसेच संजना बाळू सुरळकर (द्वितीय), पुजा कौतीक पाटील (द्वितीय), रुचिका शिवाजी केणे (द्वितीय) हे स्पर्धक विजयी झाले. सर्व विजयी स्पर्धकांना शाळेचे मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी ‘किलबिल’ हा स्वलिखित काव्यसंग्रह भेट दिला.

या कार्यक्रमास शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष रुपाली आगळे, सदस्य सुधाकर गोसावी, शिवाजी डोंगरे, विलास साळुंखे तसेच पालक हरिभाऊ लोहार, रमेश शिंगार आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयंत शेळके यांनी केले व आभार मुख्याध्यापक पी.टी.पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक देवाजी पाटील, रवींद्र चौधरी, जयंत शेळके, जयश्री पाटील, छाया पारधे, ज्योती उंबरकर, रामेश्वर आहेर यांनी परिश्रम घेतले.

 

Protected Content