राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष पाटलांच्या अंगावर धावून जाणाऱ्या दोघांवर कारवाईची मागणी

जामनेर, प्रतिनिधी | येथील नगरपंचायती निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील यांना अपशब्द वापरून दोघे अंगावर धावून गेल्याप्रकरणी त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी पक्षांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

तालुक्यातील बोदवड येथे २१ डिसेंबर रोजी नगरपंचायती निवडणुकीवेळी समाधान महाजन व छोटू भोई (वरणगाव) या दोघांनी राष्ट्रवादीचे काँग्रेस पार्टीचे नेते तथा जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्यासाहेब पाटील यांना अपशब्द वापरून अपमान केले. व अंगावर धावून आले. या घटनेप्रकरणी दोघांवर कायदेशीर कारवाई कठोर कारवाई करावी या आशयाचे निवेदन जामनेर तालुका राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी तर्फे पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना देण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते संजय गरुड, पाटील, संजय निराधार समिती अध्यक्ष प्रदीप लोढा, व्हीजेएनटी सेल जिल्हाध्यक्ष अरविंद चितोडिया, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष विलास राजपूत, जिल्हा परिषद सदस्य पती कैलास पाटील, माजी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दगडू पाटील, राष्ट्रवादी विधानसभा क्षेत्र प्रमुख किशोर पाटील, शहराध्यक्ष पप्पू पाटील, जिल्हा बँक संचालक नाना पाटील, संदीप हिवाळे, भगवान पाटील, भास्कर पाटील, प्रभू झाल्टे, दिनेश पाटील, गोपाल पाटील, शाहीर शेख अजहर शेख शब्बीर, मिस्तरी प्रभाकर पाटील, दीपक रिचवाला , संतोष धांड , राहुल इंगळे यांच्यासह राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Protected Content