पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील सुपडू भादू विद्यालयाच्या परिसरात असलेल्या एका बँकेतून वयोवृद्ध सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने काढलेले २ लाख रुपये अज्ञात भामट्यांनी लांबवल्याची घटना गुरूवारी दुपारी १२ वाजता याप्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सुभाष पाटील (वय ७१, रा. तलाठी कॉलनी, पाचोरा) हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. ते गुरूवारी ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता पाचोरा शहरांतील एचडीएफसी बँकेतून २ लाख रुपये काढले. पैसे काढून दुपारी बँकेबाहेर आले असता जाण्यासाठी दुचाकीला चाबी लावीत होते. त्याचवेळेस एका इसमाने त्यांचे जवळ येऊन चाबीस झटका मारला.
सुभाष पाटील हे खाली पडलेली चाबी शोधत असतानाच त्यांची पैशाची बॅग घेऊन चोरट्याने पळ काढला. त्याचा साथीदार सुपडू भादू विद्यालय या शाळेकडून त्याचेसमोर दुचाकी घेऊन आला. त्या भरधाव दुचाकीवर सदर चोरटा बसला आणि तिथून दोघेही चोरटे क्षणातच पसार झाले. काही कळण्याच्या आधीच वयोवृद्धाच्या हातातील दोन लाख रुपये चोरट्यांनी पसार केले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.