चोरीच्या तीन दुचाकींसह संशयित आरोपीला अटक

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । दुचाकी चोरी प्रकरणात चोरीच्या तीन दुचाकींसह छोरीया मार्केट परिसरातून १९ वर्षीय तरूणाला रावेर पोलीसांनी शिताफीने अटक केलेी आहे. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, यश प्रकाश देशमुख (वय २१, रा. शिरूर दिगर ता. शहादा हल्ली मु. विद्यानगर, रावेर) यांची दुचाकीची २ जुलै रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास चोरीस गेली होती. याप्रकरणी रावेर पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास सुरू होता. दरम्यान रावेर पोलीस स्टेशनला गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार त्यांनी रावेर शहरातील छोरीया मार्केट येथे बुधवारी ३ जुलै रोजी सापळा रचून सराईत चोरटा जगराम यारसिंह बारेला (वय १९, रा. शहापूर ता. जि. बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश) हा मिळून आला. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तर दिली. गुन्ह्यात चोरीस झालेली दुचाकी आणि इतर आणखी दोन दुचाकी त्याने काढून दिल्या असून गुन्ह्याची कबुली दिली आहे. सदर कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, सहाय्यक पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विशाल जयस्वाल, नाईक किशोर सपकाळे, समाधान ठाकूर, सचिन घुगे, विशाल पाटील, प्रमोद पाटील, महेश मोगरे आदींच्या पथकाने केली आहे.

Protected Content