तरूणाचा महागडा मोबाईल लांबविला

 

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पिंप्राळा आठवडे बाजारातून तरूणाचा २३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी १२ सप्टेंबर रोजी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, हेमंत मधुकर पवार (वय-३७) रा. आप्पा नगर, जळगाव हे आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. पिंप्राळा येथे दर बुधवारी आठवडा बाजार असतो. त्यानिमित्ताने बुधवार ७ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास बाजारात भाजीपाला घेण्यासाठी गेले होतो.

दरम्यान त्यांच्या खिश्यातील २३ हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात चोरट्यांनी हिसकावून चोरून नेल्याचे उघडकीला आले. हेमंत पवार याने परिसरात सर्वत्र मोबाईलचा शोध घेतला.

परंतू मोबाईल कुठेही आढळून आला नाही. अखेर सोमवारी १२ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल निलेश पाटील करीत आहे.

Protected Content