भुसावळ प्रतिनिधी । पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ भुसावळ तालुका वकील संघाने कँडल मार्च काढून आदरांजली अर्पण केली.
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्याचा देशभरात तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे. या अनुषंगाने भुसावळ तालुका वकील संघाने कँडल मार्च काढला. शहरातील नाहाटा चौफुलीवर असणार्या शहीद स्मारकाजवळ वकील संघाच्या सदस्यांनी जोरदार घोषणाबाजी करून पाकिस्तान व दहशतवाद्यांचा निषेध केला. यात तालुका संघाचे अध्यक्ष अॅड. तुषार पाटील, उपाध्यक्ष अॅड धनराज मगर, सचिव आर.डी. पटेल, सहसचिव पुरूषोत्तम पाटील, कोषाध्यक्ष राजेश कोळी, महिला प्रतिनिधी जास्वंदी भंडारी व ग्रंथपाल संजय तेलगोटे यांच्यासह तालुका वकील संघाने सदस्य उपस्थित होते.
पहा– भुसावळ तालुका वकील संघाच्या कँडल मार्चचा व्हिडीओ.