व्यापारी बांधवांतर्फे गुणवंत विद्यार्थींनींचा सत्कार सोहळा

पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पारोळा शहरात मोठे हनुमान मंदिर मित्र मंडळ आणि व्यापारी बांधव यांच्या वतीने दहावीत घवघवीत यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थिनींचा सत्कार सोहळा पार पडला. यात पारोळा तालुक्यातून दहावीत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या पूर्वा बागड आणि मुलींमध्ये महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या भार्गवी सोनार यांचा विशेष सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

पारोळा शहरात मोठे हनुमान मंदिर मित्र मंडळ आणि व्यापारी बांधव हे सालाबादप्रमाणे हनुमान चालीसा पठण आणि हनुमान जयंतीनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करत असतात. तसेच, विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या सत्कार समारंभांचेही ते नियमितपणे आयोजन करतात. जनसेवक पी. जी. पाटील हे धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यांमध्ये नेहमीच अग्रेसर असतात.

या सत्कार सोहळ्याला जनसेवक पी. जी. पाटील, विलास शेठ वाणी, प्रशांत शेठ बागड, प्रकाश आबा शिंपी, रमेश बाबा अमृतकर, सुनील शेठ सोनार, बालू शेठ शिंपी, अतुल शेठ वाणी, जितेंद्र शेठ बारी, भूषण सोनार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळेल आणि सामाजिक बांधिलकीची भावना दृढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.