जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील शिवाजी नगरात राहणाऱ्या एका तरूणाला किरकोळ कारणावरून शिवीगाळ व धमकी देवून तीक्ष्ण हत्याराने वार करून गंभीर दुखापत केल्याची घटना शनिवारी २४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता घडली आहे. याप्रकरणी रविवारी २५ मे रोजी पहाटे ५ वाजता जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, विजय संजय राठोड हा तरूण आपल्या परिवारासह शिवाजी नगरात वास्तव्याला आहे. शनिवारी २४ मे रोजी सायंकाळी साडेसात वाजता किरकोळ कारणावरून प्रेम विलास सांगोरे रा. डीमार्ट, जळगाव, विलास रमेश सांगोरे, अमोल रमेश सांगोरे, ओम कैलास सांगोरे सर्व रा.शिवाजी नगर जळगाव यांनी नारूच्या नशेत येवून शिवीगाळ व धमकी दिली. त्यानंतर विजयच्या घरात घुसून तीक्ष्ण हत्याराने वार करून त्याला जखमी केले. याप्रकरणी विजयची आई मंगला राठोड यांनी जळगाव शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार रविवारी २५ मे रोजी पहाटे ५ वाजता प्रेम विलास सांगोरे रा. डीमार्ट, जळगाव, विलास रमेश सांगोरे, अमोल रमेश सांगोरे, ओम कैलास सांगोरे सर्व रा.शिवाजी नगर जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ओमप्रकाश सोनी हे करीत आहे.