जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी। जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथील बसस्थानक येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका चालकाला लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना बुधवारी २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २९ मे रोजी रात्री १० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात १८ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, शेख फिरोज शेख सलीम वय ३३ रा. नशिराबाद हा तरूण आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. बुधवारी २८ मे रोजी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शेख फिरोज शहा नशिराबाद गावाची गावातील बसस्थानकाजवळ उभा असताना जुन्या वादातून गावात राहणारे अल्लाउद्दीन शहा उर्फ माया भाई, मुक्तार शहा शालील शहा, शफी उल्ला शहा उर्फ लल्या मेहबूब शहा, मुशा शहा, सहीद शहा मुशा शहा, मोसिन शहा सलीम शहा, शोएब शहा सलीम शहा, सादिक शहा आफिजउल्ला शहा, अक्रम शहा सादिक शहा, वसीम शहा रहमान शहा, अख्तर शहा रहमान शहा, जबी उल्हास शहा खलील शहा, नावीद शहा, साजिद शहा फरीद शहा, मेहबूब शहा कादर शहा, फिरोज शहा नूरशहा, शोएब शहा खलील शहा, यासीन शहा नूर शहा (सर्व रा. नशिराबाद) यांनी लोखंडी रॉड आणि लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी शेख फिरोज शेख सलीम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारा १४ जणांनी होतात नशिराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.