Home क्राईम बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लांबविले

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र लांबविले

0
275

भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव बसस्थानक आवारात बसमध्ये चढत असताना एका महिलेच्या गळ्यातील १४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना २४ मे रोजी दुपारी साडेचार वाजता घडली. या संदर्भात गुरुवारी २९ मे सायंकाळी सहा वाजता भडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सुनंदा बापू पाटील (रा. भालगाव, ता. एरंडोल) या २४ मे रोजी दुपारी साडेचार वाजता भडगाव शहरातील बसस्थानकात आल्या होत्या. बसमध्ये चढत असताना, अज्ञात चोरट्याने त्यांच्या गळ्यातील १४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र लंपास केले. ही घटना लक्षात आल्यानंतर महिलेने अखेर चौकशीअंती गुरुवारी २९ मे सायंकाळी सहा वाजता भडगाव पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल विजय जाधव करत आहेत.


Protected Content

Play sound