Breaking : केंद्रीय मंत्री हरसीमरत कौर यांचा राजीनामा

 

नवी दिल्ली- राष्ट्रीय लोकशाही आघाडीचा घटक पक्ष असलेल्या शिरोमणी अकाली दलाच्या केंद्रीय मंत्री हरसीमरत कौर यांनी  पीएम मोदी यांच्या मंत्रिमंडळातून राजीनामा दिला आहे.

शेतकरी बिलाचा विरोध करत  हरसीमरत कौर यांनी राजीनामास्त्र उपसले आहे. कृषी बिलावर एनडीएत फूट पडली आहे. या विधेयकाला विरोध दर्शवताना अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल म्हणाले की, कृषी विधेयकाच्या निषेधार्थ केंद्रीय मंत्री हरसिमरत कौर बादल सरकारमधून राजीनामा देतील.

आज लोकसभेत बोलताना सुखबीरसिंग बादल यांनी स्पष्ट केले की शिरोमणी अकाली दल या विधेयकाला तीव्र विरोध करत आहे. प्रत्येक विधेयक जे देशासाठी आहे, देशातील काही भागात ते आवडते, काही भागात ते स्वागतार्ह नाही, शेतकऱ्यांसाठी आणलेल्या या तीन विधेयकाचा परिणाम आमच्या पंजाबमधील २० लाख शेतकऱ्यांवर होणार आहे. ३०  हजार आडते, 3 लाख मंडई कामगारसह २० लाख शेतमजुरांवर परिणाम होणार आहे.

Protected Content