मोदी सरकारकडून शालेय शिक्षण निधीमध्ये ३ हजार कोटींची कपातीची शक्यता

modi

 

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) केंद्रातील मोदी सरकारच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्याने २०१९-२० च्या अर्थसंकल्पामध्ये शालेय शिक्षणासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीमधील तीन हजार कोटींची कपात केली जाण्याची शक्यता आहे.

आर्थिक चणचण असल्याने शालेय शिक्षणासाठी मंजूर करण्यात आलेल्या निधीमध्ये कपात करण्यात यावी असा प्रस्ताव अर्थमंत्रालयाने सरकारसमोर सादर केला आहे. शालेय शिक्षण विभागाला २०१९-२०२० या आर्थिक वर्षासाठी ५६ हजार ५३६ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला होता. दरम्यान, मोदी सरकारकडून हा पैसा त्यांच्या श्रीमंत मित्रांना मदत करण्यासाठी वापरला जाईल अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ट्विटवरुन मोदी सरकारवर टीका केली आहे.

Protected Content