पूर्ण प्रवासी क्षमतेने एसटी बस सेवा चालवण्याची सशर्त परवानगी

 

मुंबई- राज्य सरकारकडून एसटी महामंडळाला पूर्ण प्रवासी क्षमतेने सेवा सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अटी-शर्थींसह ही परवानगी देण्यात आली आहे.

लॉकडाउनमुळे एसटी महामंडळाला खूप मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला आहे. बंद असलेली एसटी सेवा सध्या सुरु असली तरी अद्यापही पूर्ण क्षमतेने सेवा सुरु नाही. मात्र आता अटी-शर्थींसह ही परवानगी देण्यात आली आहे. याआधी २० जुलैला सोशल डिस्टन्सिंग पाळत आसन क्षमतेच्या ५० टक्के आंतरजिल्हा वाहतूक सुरु करण्यास परवानगी देण्यात आली होती.

दरम्यान राज्य सरकारकडून दोन आसनांमध्ये पडदा लावण्याचा प्रस्ताव नाकारण्यात आला. आपत्ती व्यवस्थापन विभागाला यासंबंधी प्रस्ताव पाठवण्यात आला होता. त्यांनी म्हटलं आहे की, “बसमधील दोन आसनांमध्ये पडदा लावणं इष्ट वाटत नाही. तसेच खासगी प्रवासी वाहतूक दोन प्रवाशांमध्ये पडदा लावून होत नाही. विमान व ट्रेनमध्येही पडदे नाहीत. सध्या करोनामुळे वाहतूक क्षमतेच्या १०० टक्के होत नाही. त्यामुळे पडद्याशिवाय वाहतूक करणं योग्य वाटतं”.

Protected Content