वीर जवान अमोल पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार !

पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील जोगलखेडा गावचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यदलाचे वीर जवान अमोल पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मणिपूर सीमेवर कर्तव्य बजावत असताना त्यांची प्रकृती अचानक खराब झाली होती. त्यांना जवळच्या सैनिकी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र प्रकृती अधिक खालावल्याने पुढील उपचारासाठी दिल्ली येथील एम्स रुग्णालयात हलवण्यात आले. दुर्दैवाने, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

अमोल पाटील यांचा मृतदेह विमानाने छत्रपती संभाजीनगर येथे आणण्यात आला आणि तेथून त्यांच्या मूळगावी जोगलखेडा येथे आणण्यात आला. मृतदेह गावात येताच “अमोल पाटील अमर रहे” च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नातेवाईकांनी एकच हंबरडा फोडला, तर संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती. सायंकाळी ५ वाजता जोगलखेडा येथे वीर जवान अमोल पाटील यांना अखेरची मानवंदना देत, शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Protected Content