Home Cities अमळनेर धक्कादायक! शाळेतील ओळखीतून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

धक्कादायक! शाळेतील ओळखीतून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

0
108


अमळनेर लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी|  अमळनेर शहरातील एका शाळेत शिकणाऱ्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलीला व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन गेल्या पाच वर्षांपासून अत्याचार केला. त्यानंतर पिडीत मुलीसोबत जबरदस्ती लग्न करून धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संदर्भात अमळनेर पोलीस ठाण्यात रविवारी २५ मे रोजी रात्री ९ वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, गुजरात राज्यातील सुरत येथील रहिवासी असलेली १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही पारोळा तालुक्यातील एका गावात नातेवाईकांकडे गेल्या पाच वर्षांपूर्वी वास्तव्याला होती. त्यावेळी ती अंमळनेर येथील एका शाळेत शिक्षण घेत होती. शाळेचे स्नेहसंमेलनमध्ये संशय आरोपी जितेंद्र अनिल सदानशिव रा. फरशी रोड अमळनेर याच्याशी ओळख निर्माण झाली. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन २०२० पासून पीडित मुलीवर त्याने अत्याचार केला तसेच त्यानंतर पीडित मुलीने यास नकार दिला, त्यावेळी त्याने सोबत असलेले आक्षेपार्ह व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच त्यानंतर तिच्यासोबत पुणे येथे जाऊन बळजबरी विवाह कार्यालयात लग्न लावून शारीरिक व मानसिक त्रास दिल्याचे समोर आले आहेत. दरम्यान हा धक्कादाय प्रकार घडल्यानंतर पीडित मुलीने अखेर पोलिसांना तक्रार दिली. त्यानुसार अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी जितेंद्र अनिल सदानशिव याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम करीत आहे.


Protected Content

Play sound