पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा तालुक्यात एका गावात अल्पवयीन मुलीच्या विनयभंगाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. १७ मे रोजी रात्रीच्या सुमारास घरात एकटी असताना १६ वर्ष ९ महिने वयाच्या पीडित मुलीचा सनी संजय पाटील (वय २१) या तरुणाने विनयभंग केल्याची घटना घडली. पीडितेने आरडाओरड केल्यानंतर ग्रामस्थांनी सनी पाटील याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.
याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १७ मे रोजी रात्री ८:१५ वाजता पीडित मुलगी घरात एकटी होती. त्यावेळी सनी पाटील तिच्या घरात घुसला आणि त्याने तिचा हात पकडून मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. पीडितेच्या ओरडण्यामुळे ग्रामस्थ धावले आणि त्यांनी आरोपीला पकडले.
सनी पाटील याच्याविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोपान गोरे हे करत आहेत. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.