Home क्राईम बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र लांबविले

बसमध्ये चढतांना महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसुत्र लांबविले

0
132


जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नवीन बसस्थानकात बसमध्ये चढणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची मंगळसूत्र कापून चोरून नेल्याची घटना रविवारी २५ मे रोजी दुपारी ३ वाजता समोर आली आहे. या संदर्भात रात्री ८ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लक्ष्मी प्रमोद चौधरी (वय-३५, रा. जानकी नगर, जळगाव) या महिला रविवारी २५ मे रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास चाळीसगाव जाण्यासाठी जळगाव बसस्थानकात आलेल्या होत्या. बसमध्ये चढत असताना दोन महिला धुरपता अक्षय भोसले वय-३० आणि तिच्यासोबत असलेली तिची अल्पवयीन मुलगी दोन्ही रा. सिल्लोड जि. छत्रपती संभाजी नगर यांनी महिल्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र तोडून चोरून नेला. दरम्यान ही घटना घडल्यानंतर महिलेने जिल्हापेठ पोलीस ठाण्यात या संदर्भात तक्रार दिली आहे. त्यानुसार रात्री ८ वाजता धुरपता अक्षय भोसले आणि तिची अल्पवयीन मुलगी या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस लाईन कमलेश पवार करीत आहे.


Protected Content

Play sound