बोदवड ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बैठक उत्साहात

बोदवड – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांची बैठक तालुकाध्यक्ष कुंदन गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली व कामगार नेते अमृत महाजन, ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष संतोष खरे यांच्या मार्गदर्शनाखाली बोदवड पंचायत समिती सभागृहात पार पडली.

त्यावेळी महाराष्ट्रातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सरकारने किमान वेतनात 60 टक्के पगार वाढ केली व ती लागू करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे या कर्मचाऱ्यांना या महिन्यापासूनच नवीन वाढीव वेतन मिळणार असून मागील तीन महिन्याचा फरकही मिळणार आहे. ग्रामपंचायत कर्मचारी गेल्या 40 वर्षात प्रथमच पाच अंकी पगारावर पोहचले या लढ्यात महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचे जिल्ह्याचे नेते राज्य सचिव का अमृत महाजन यांचे योगदान मोलाचे आहे, असे गौरवोदगार जिल्हाध्यक्ष संतोष खरे जलचक्र यांनी काढले.

तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी महासंघातर्फे अमृत महाजन यांचा  कपडे शाल व गुलाब पुष्प देऊन महासंघाचे तालुका अध्यक्ष कुंदन गायकवाड, उपाध्यक्ष उखा धीवर, सहसचिव रवींद्र पाटील, सचिव मधुकर जंगले  यांनी सत्कार केला.

त्यावेळी जिल्हाध्यक्ष खरे यांचाही सन्मान केला. सत्काराला उत्तर देताना कॉम्रेड महाजन म्हणाले की, कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावी पगारासाठी अनुदान मिळणे साठी वसुलीची अट नको सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतनश्रेणी या साठी मूलभूत प्रश्न संघर्ष सुरूच ठे वावा लागणार आहे सांगून युनियनचे पद म्हणजे काटेरी मु कुट असतो पण या मानाच्या पदामुळे  श्रमिक जनतेच्या सेवेची नामी संधी मिळते यांच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्याला मिळालेल्या पदा ला न्याय द्यावा  कर्मचाऱ्यांनी विचलित न होता ग्रामपंचायत कर्मचारी महासंघ मजबूत करावा, असे आवाहन केले.  कुंदन गायकवाड यांनी आभार प्रदर्शन केले.

या मेळाव्याला तालुक्यातील  २५ पंचायत मधून २८ कर्मचारी हजर होते. त्यात मधुकर जंगले, रवींद्र पाटील ,रतीलाल जाट, उखरडू धीवर, मधुकर माळी, सोपान पाटील, समाधान वाघ, प्रमोद सोनवणे, नरेंद्र महाजन, योगेश वानखेडे, पंडित वाघ, नितीन टेकाळे, प्रवीण ठाकरे, योगेश केने, चरणसिंग पाटील, रामचंद्र पाटील, किशोर चौधरी, रमेश तायडे, रामा अवचार, ममता छप्रवाल कर्मचारी/ पदाधिकारी आदींचा समावेश होता.

 

Protected Content