Home धर्म-समाज डोणगाव येथील विकासोच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

डोणगाव येथील विकासोच्या नवनिर्वाचित संचालकांचा सत्कार

0
84

यावल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील डोणगाव येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन व संचालकांचा सत्कार जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक विनोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनोद पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादीचे चोपडा विधानसभा क्षेत्र प्रमुख अनिल साठे उंटावद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन शशीकांत (शशी आबा)गुलाबराव पाटील संजय गांधी निराधार समीतीचे सदस्य दिनकर पाटील व डोणगावच्या सरपंच आशाबाई पाटील उपस्थितीत होत्या.

तसेच याप्रसंगी विकासोसाचे चेअरमन साहेबराव पाटील, व्हा.चेअरमन गणेश  पाटील ,संचालक सुधीर पाटील, गुलाब  पाटील, संजय  पाटील, शामराव  पाटील, जनार्दन पाटील, रामकृष्ण पाटील, पंडीत भालेराव, आनंदा  धनगर, शालीक पाटील, आशाबाई पाटील, सुरेखा पाटील यांचा सत्कार विनोद पाटील यांनी केला.

उपसरपंच मनोहर भालेराव, दिवाकर पाटील, ग्राम पंचायत सदस्य शांताराम पाटील, विलास कोळी, भगवान पाटील, माजी ग्रा.प.सदस्य शंकर मगरे, निंबा टेलर, अभिमन पाटील, हेमराज पाटील, तेजस भालेराव, संजय भालेराव, विकास  कोळी, आकाश  कोळी, निलेश खैरनार, विजय पाटील, बबलू  पाटील, रतिभान पाटील, ईश्वर पाटील इ.सह ग्रामस्थ उपस्थीत होते.

या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोसायटीचे सचिव वना वसंत पाटील यांनी केले.


Protected Content

Play sound