Home क्राईम बोदवड येथे हार्डवेअर दुकान फोडून 40 हजाराचा मुद्देमाल लंपास

बोदवड येथे हार्डवेअर दुकान फोडून 40 हजाराचा मुद्देमाल लंपास

0
59
bodwad dukan fodale
bodwad dukan fodale


bodwad dukan fodale

बोदवड प्रतिनिधी । शहरातील हार्डवेअर व स्टिल या दुकानाच्या बाजूची भिंत फोडुन अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कमेसह ४० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरुन नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. याबाबत अज्ञात चोरट्याविरोधात बोदवड पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला.

 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, २७ रोजी सायंकाळी ७:३० ते सकाळी २८ रोजीच्या पहाटे 8 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बोहराजी हार्डवेअर, बाबजी स्टिल दुकानाच्या भिंत तोडुन पंखे २ नग ९ हजार रुपये, मार्बल कटर १ नग २५०० रुपये, हँड ग्रँन्डर २५०० रुपये, इलेक्ट्रीक काटा १ नग ४ हजार रुपये, कटींग व्हिल ३० नग ६ हजार रुपये, मंगल वेंव्डीग रॉड १२ पॉकीड ३ हजार रुपये, स्रु ६ ब्कॉक्स २५०० रुपये, वेल्डिंग होल्डर १० नग २००० रुपये, पॉवर केबल १ नग ५०० रुपये रोख रक्कम ८४०० असे एकुन ४० हजार ४०० रुपयाचा माल चोरून नेला. फिर्यादी मुर्तजा केजार पाटा (वय-२४) रा. मलकापूर यांच्या फिर्यादीवरून बोदवड पोलीसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


Protected Content

Play sound