बामणोद शिवारात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रक्टरला दंड

yawal tractar karwai

यावल (प्रतिनिधी)। तालुक्यातील बामणोद शिवारामध्ये महसुल प्रशासनाच्या कार्यवाहीत अनधिकृतरित्या वाळुची वाहतुक करणारा ट्रॅक्टर जप्त करण्यात आले असून दंडाची नोटीस बजावली आहे.

 

यावल तालुक्यातील बामणोद शिवारातील म्हैसवाडी चिखली रस्त्यावर २८ जून २०१९ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टरचालक विजय सुरेश सपकाळे राहणार अंजाळे तालुका यावल हा त्याच्या ताब्यातील ट्रॅक्टर क्र. (एमएच १९ पी ४५६१) या तोताराम शांताराम पाटील यांच्या मालकीच्वा वाहनाने वाळुची अनाधिकृतपणे वाहतुक करीत असतांना वाकुने भरलेला ट्रेक्टर हा म्हैसवाडी चिखली मार्गावरील रस्त्याच्या साईडला फसल्याने त्याच ठिकाणी ट्रॅक्टरखाली करीत असतांना बामणोद सजाचे तलाठी के.के.तायडे व सहाय्यक नरेंद्र भागवत फिरके व त्यांच्या सोबत कोतवाल प्रशांत प्रमोद सरोदे यांनी सदरच्या ट्रॅक्टर वाहनाचा पंचनामा करून, ट्रॅक्टरला यावल येथील तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. संबधीत वाहनमालक यांच्या कडुन सुमारे 1 लाख 20 हजार रुपये दंडात्मक स्वरूपात वसुलीची नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार जितेन्द्र कुंवर आणी निवासी नायब तहसीलदार आर.के. पवार यांनी दिली.

Protected Content