जळगावात मायलेकीवर चाकू हल्ला; एकास अटक

 

जळगाव प्रतिनिधी । दारूच्या नशेत एकाने अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करत तिचा विनयभंग केला आहे. एवढेच नव्हे तर, पिडीत मुलीच्या आईच्या डाव्या हातावरही चाकूने वार करत गंभीर जखमी केल्याची घटना भोईटेनगर येथे रात्री घडली. याप्रकरणी तरूणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, भोईटेनगर परिसरात एक महिला आपली १६ वर्षीय मुलगी व मुला सोबत राहतात. दोन वर्षांपुवी महिलेच्या पतीचे दिर्घ आजाराने निधन झाले आहे. महिला मिळेल ते काम करून आपला कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. गल्लीतीलच विकी अशोक घोरपडे रा. भोईटे नगर याने शनिवारी रात्री 10.30 वाजेच्या सुमारास घरास घुसन संबंधित महिलेच्या मुलीचा विनयभंग केला. याचा जाब महिलेने विचारला असता विकीने घरातील किचनमधील चाकू आणून डाव्या हातावर वार करून महिलेला जखमी केले. तर त्यांच्या मुलीच्या छातीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर रात्री नातेवाईकांनी दोघांना जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले. यात मुलीची प्रकृती गंभीर असून तिला खासगी रूग्णालयात हलविण्यात आले आहे. याप्रकरणी शहर पोलीसात विकी घोरपडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आज सकाळी अटक करण्यात आली आहे.

Protected Content