पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त रावेर शहरात रक्तदान शिबीर

रावेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | रावेर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त युवा प्रदेशाध्यक्ष संदीप सावळे यांच्या नेतृत्वात भव्यरक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.यावेळी सुमारे सत्तर रक्तदातांनी रक्तदान केले

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंती निमित्त आज सकाळी धनगर समाजातर्फे सुरुवातीला प्रतिमा पूजन करण्यात आले.त्यानंतर भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी धनगर समाज जेष्ठ नेते सुरेश धनके धनगर समाज संघर्ष समिती लखन सावळे, जिल्हा उपाध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती डॉ. भगवान कुयटे, डॉ. सुचिता कुयटे, डॉ गणेश कचरे, डॉ. पुनम कचरे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक जयेश कुयटे, प्रवीण पाचपोहे, तुषार कचरे, अल्पेश सोनवणे, पंडित धनगर, हिरालाल सोनवणे, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन पाटील, प्रणित महाजन, दिगंबर बोरसे, उपसरपंच स्वप्नील लासुरकर, दीपक सोनवणे, विजय पाटील, अजय कचरे, नारायण पाटील, सागर बोरसे, किरण शेलवडे, यश वाघ, पूर्वेद कचरे, मयूर कवडकर, सचिन कवडकर, राहुल सावळे, डॉ. प्रतीक वाघ, रावेर गोदावरी फाउंडेशनचे डॉ. नितीन भारंबे, लक्ष्मण पाटील यांच्यासह सर्व समाज बांधवांचे सहकार्य लाभले.

 

 

Protected Content