गाळेधारकांना शक्य तितक्या लवकर पैसे भरण्याचे आयुक्तांचे आवाहन (व्हिडीओ)

WhatsApp Image 2019 09 20 at 4.11.11 PM

जळगाव, प्रतिनिधी | शक्य तितक्या लवकर नोटीस प्रमाणे पैसे भरण्याच्या सूचना आयुक्त उदय टेकाळे यांनी दिले असल्याची माहिती गाळेधारक कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी दिली.

गाळेधारकांना दिलेले अवाजवी भाडे, दंडात्मक रक्कम कमी करण्यात यावा व सकारत्मक तोडगा काढावा यासाठी आज मनपा मालकीच्या १८ व्यापारी संकुलातील ४०० ते ४५० गाळेधारक महापालिकेत आले होते. महापालिकेच्या मुदत संपलेल्या १८ व्यापारी संकुलांतील गाळेधारकांच्या प्रतिनिधींनी शुक्रवारी महापालिकेत आयुक्त उदय टेकाळे यांची भेट घेतली. या वेळी कोअर कमिटीचे अध्यक्ष डॉ. शांताराम सोनवणे यांनी मुदत संपलेल्या गाळ्याबाबत सकारात्मक तोडगा काढावा, असे साकडे आयुक्त टेकाळे यांना घातले. छोटे दुकानदार एवढी मोठी रक्कम भरू शकणार नाहीत असे डॉ. सोनवणे यांनी यावेळी सांगितले. ४ पट दंडाची रक्कम कमी करण्याची मागणी गाळेधारकांनी केली. त्यांना काही मर्यादा आहेत असे आयुक्त टेकाळे यांनी स्पष्ट करत हे पैसे न चुकणारे आहेत याची जाणीव गाळेधारकांना करून दिली. व्यापाऱ्यांनी ४ पट दंडाची रक्कम कमी करावी व शास्ती वगळावी अशी मागणी केली असता तसा ठराव करून द्या असे मत आयुक्तांनी मांडले. आणि तसा ठराव करून देण्याचा कोणीही धोका पत्करणार नाही असे स्पष्ट केले. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील सभागृहात गाळेधारकांना संबोधित करतांना डॉ. सोनवणे यांनी सांगितले की, शासनाने गाळेधारकांसंदर्भात काढलेला जी. आर.जाचक आहे. त्याला न्यायालयात आव्हान दिले जाईल. या संदर्भात ना. चंद्रकांत पाटील, ना. गिरीश महाजन, आ. राजूमामा भोळे तसेच मुख्यमंत्र्यांनी  यांनी वेळोवेळी आश्वसन दिले आहे. परंतु, कोणीच त्यांचे आश्वासन पाळले नसल्याचेही डॉ. सोनवणे यांनी सांगितले.   यासंदर्भात लवकरच ना. गिरीश महाजन यांना  विनंती करण्यात येईल अशी माहिती डॉ. सोनवणे यांनी दिली.

Protected Content